- Advertisement -spot_img
Homeमहाराष्ट्रBhandara Vidhansabha Election : भंडारा विधानसभेचे जनता स्ट्राग पर्यायी उमेदवाराच्या प्रतीक्षेत !

Bhandara Vidhansabha Election : भंडारा विधानसभेचे जनता स्ट्राग पर्यायी उमेदवाराच्या प्रतीक्षेत !

- Advertisement -spot_img

वेट & वाच, “याला” पर्याय कोण ?

Bhandara Vidhansabha Election : राज्यात होत असलेलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मतदानाची तारीख १० दिवस उरली असताना सामाजिक व राजकीय समीकरणाचा तिढा सुटलेला नाही. भंडारा विधानसभा अनुसूचित जाती करिता राखीव असून त्यात जवळपास एक लाखाच्या वर अनुसूचित जातीचे मतदार आहेत, त्यातील “महार” जातीच्या मतदारांचा प्राबल्य असून त्यालाच अनुसरून राजकीय पक्षांनी आणी अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी दखल केली आहे. त्याच प्रमाणे पैसा हा सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे. क्षेत्राचा विकास, बेरोजगारी, कृषी मालाला भाव व लाडकी बहिण सारख्या फुसक्या घोषणा निरर्थक आहेत. निवडून आल्यावर निर्वाचित नेत्याला घोषण, वादे, शपथ, विकासाची कास याचा रीतसर विसर पडतो, लक्ष असते ते फक्त कमिशनखोरी, कामातील टक्केवारी, महसूल व पोलीस अधिकारी यांच्या कडून वसुली, कार्यकर्ते व ठेकेदार यांचे कडून कमिशन, पोलीस पाटील, कोतवाल भरती मध्ये रिस्वत, रेती तस्करी मध्ये छुपा हिस्सा या मध्ये. परंतु आता जनता याला पूर्ण कंटाळली असून पर्यायी उमेदवाराच्या प्रतीक्षेत वेट & वाच भूमिकेत असल्याचे भंडारा विधानसभेत सध्या तरी चित्र आहे.

भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस (अजित गट NCP) यांची भूमिका

राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाची (NCP) भुमीका भूमिका महत्व पूर्ण असणार आहे. कारण भाजपा हा गैर बौद्ध व्यक्तीला मतदान करणारा पक्ष आहे तर राष्ट्रवादी (NCP) जात, धर्म निरपेक्ष भुमीका असलेला पक्ष आहे. या शिवाय प्रस्थापित नेत्याच्या विरुद्ध अनेक पक्षीय व व्यक्तिगत अतिशय कमालीची नाराजी असल्याचे दिसते. मागील काळात चार दुकान गाळे फुकट दिले म्हणून  राष्ट्रवादी कांग्रेस च्या दोन  नेत्याच्या, दोन मुलांवर  अॅट्रॉसिटी कायदा  अंतर्गतखोटीतक्रार आपल्या हस्तका कडून करूवून घेऊन  फसविण्याचा प्रयत्न केला. तसेच राष्ट्रवादी कांग्रेस च्या अनेक लोकांच्या शाळा, शिव भोजन केंद्र, कंत्राटदारी व्यवसाय  आहेत यांना आर्थिक त्रास देण्याचे अतिशय महान कार्य केले आहे. यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस ची भूमिका सुद्धा वेट & वाच ची दिसत आहे.

भाजपा (BJP) ची भुमिका

भंडारा जिल्हा भाजपा (BJP) ची भुमिका जवळपास राष्ट्रवादी कांग्रेस (NCP) सारखी आहे. या अगोदर या प्रस्थापित नेत्याने मागील दोन निवडणुकीत भाजपा विरुद्ध बंडखोरी केलेली आहे. त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस व आमदार परिणय फुके विरुद्ध अनेक आपत्तीजनक  वक्तव्य केलेले आहेत त्यामुळे त्याचीही नाराजी असण्याही शक्यता असण्याची शक्यता नाकारता येत आणी कारण लोकशाहीत निवडनुक हेच हिशेब चुकता करण्याचे एकमेव साधन आहे आणी योग्य वेळ सुद्धा. मागील लोकसभा निवडणुकीत बघ्याची भूमिका त्यातून असहकार्य आणी कार्यकर्त्यांना तुम्हाला वाटते ते करा असा संदेश दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपा कार्यकर्ते व नेते विसरणार नाहीत. यामुळे भाजप ची भूमिका सुद्धा वेट & वाच ची आहे.

स्ट्राग पर्यायी उमेदवार कोण ?

१)पुजाताई गणेश ठवकर (गजभिये) २) नरेंद्र पहाडे- अपक्ष (बंडखोर शिवसेना)  3) देवांगनाताई विजय गाढवे (अपक्ष) ४) प्रेमसागर गणवीर- अपक्ष (बंडखोर कांग्रेस) हे चार उमेदवार चर्चेत पुढे आहेत यातील कोण उमेदवार प्रचारात पुढे राहतो, कोण कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो, उमेदवार कसा जनतेला प्रभावित करतो यावर अवलंबून असणार आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here